लाल साडीत खुलल्या करवलीताई सायली संजीव

By  
on  

अभिनेत्री सायली संजीवचा सध्या कहीच नेम नाही.एकामागोमाग एक तिने सिनेमांचा धडाका सुरु केला आहे. काहे दिया परदेस म्हणत ती छोट्या पडद्यावरुन रसिकांच्या भेटीला आली आणि अल्पावधीतच रसिकांच्या गळ्यातला ताईत बनली.  काही दिवसांपूर्वीच आटपाडी नाईट्समधून रसिकांच्या भेटीला आलेल्या सायलीचे 'मन फकीरा' आणि 'पैठणीची गोष्ट', 'सातारचा सलमान' हे  सिनेमे लवकरच प्रदर्शित होणार आहेत. त्यापूर्वीच तिच्या आणखी एका आगामी सिनेमाची घोषणा झाली आहे. तो म्हणजो 'बस्ता' 

 

सध्या सर्वत्र लग्नसराईचा माहौल सजलाय. मग नटण्या थटण्याला नुसता बहार येतो आणि त्यातून घरचं लग्न असेल तर पाहायलाच नको. सायलीच्या भावाचं नुकतंच लग्न होतं आणि यानिमित्त करवली बाईंचा थाटच न्यारा होता. 

 

 

लाल रंगाच्या साडीत सायली संजीवचं सौंदर्य खुललं होतं आणि तिचा ब्लाऊज तर लक्षवेधीच ठरतोय. हा जरी पदराची साडी नेसून  त्यावर तिने केसात गुलाबाची लालभडक फुलं माळून व हिरवागार चुडा घालून तो साज परिपूर्ण केला. 

 

Recommended

Loading...
Share