By  
on  

पाहा Video: कोठारे मायलेकींनी सेटवर घेतला बर्फाच्या गोळ्याचा आनंद

उर्मिला आणि जिजा कोठारे अनेकदा फॅन्सना Mother-daughter goals देत असतात. अनेकदा ही माय लेकींची जोडी सोशल मिडियावर क्युट फोटो आणि व्हिडियो शेअर करत असते. आताही त्यांनी असाच क्युट व्हिडियो सोशल मिडियावर शेअर केला आहे. या व्हिडियोमध्ये जिजा आणि उर्मिला बर्फाचा गोळा खात आहेत. पहिल्यांदा बर्फाचा गोळा खातानाचा जिजाच्या चेह-यावरील आनंद स्पष्ट दिसत आहे. ही जोडी ‘एकदा काय झालं’ च्या सेटवर दिसत आहे. 

 

 

जिजाच्या जन्मानंतर तिने काही काळ सिनेमातून ब्रेक घेतला होता. पण आता सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘एकदा काय झालं’ या सिनेमातून पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. या सिनेमात तिच्यासोबत सुमीत राघवनदेखील आहे.  याच सेटवरचा आज जिजासोबतचा व्हिडियो तिने शेअर केला आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive