By  
on  

‘प्रवास’ सिनेमा पाहून आशाताई झाल्या इमोशनल

अशोक सराफ-पद्मिनी कोल्हापुरे अभिनीत प्रवास सिनेमाचा प्रिमिअर नुकताच पार पडला. या सिनेमाच्या प्रिमिअरला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. याशिवाय आशा भोसले, जुही चावला, महेश कोठारे, अशोक –निवेदिता सराफ तर पद्मिनी आपल्या मुलांसोबत दिसून आल्या. यावेळी आशा ताईंनी सिनेमाविषयी भावना व्यक्त केल्या. 

 

 

यावेळी आशाताई भावनिक झाल्या होत्या. त्या म्हणतात, ‘ फार सुंदर सिनेमा आहे. प्रत्येक व्यक्तीने हा सिनेमा पाहायला हवा. आज दुनियेत जे काही चाललं आहे. ते या सिनेमात दिलं आहे. अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांचा अभिनयही उत्तम झाला आहे. सिनेमा पाहताना मी खुप रडले आहे. त्यामुळे मला जास्त बोलता येणं शक्य नाही. संगीत आणि गाणीही या सिनेमात चांगली आहेत.’प्रवास हा सिनेमा 14 फेब्रुवारीला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive