धक्कादायक ! अभिनेत्री गायत्री दातारला सोशल मिडियावर अश्लील मेसेज

By  
on  

राज्यभरात महिलांवर अत्याचारांच्या अनेक घटना ताज्या असताना अभिनेत्री गायत्री दातारलाही किसळवाण्या प्रकाराचा सामना करावा लागला आहे. ‘तुला पाहते रे’ मधील ईशाच्या व्यक्तिरेखेतून घराघरात पोहोचलेल्या गायत्रीला सोशल मिडियावर अश्लील मेसेजचा सामना करावा लागला आहे. गायत्रीने हे मेसेज सोशल मिडियावर शेअर करून त्या व्यक्तीचं कृष्णकृत्य सर्वांसमोर आणण्याचं ठरवलं आहे.

ती म्हणते, ‘असेही काही लोक आहेत ज्यांच्या मनात खुप नकारात्मकता भरली आहे. केवळ माझ्यासाठीच नाही तर सर्व महिलांसाठी. हे खुप धक्कादायक आहे. द्वेषच नाही तर असे मेसेज पाठवणही धक्कादायक आहे. यापुर्वीही गायत्रीला अशा प्रकाराला सामोरं जावं लागलं होतं. त्यावेळीही तिने त्या व्यक्तीला सर्वांसमोर उघड केलं होतं. गायत्रीने या व्यक्तीबाबत इन्स्टाग्रामवर रिपोर्ट करण्याच आवहनही चाहत्यांना केलं आहे.

Recommended

Loading...
Share