अखेर पुण्यात ‘सविताभाभी’ला थांबण्याचा आग्रह करणारे सापडले, पाहा कोण आहेत ही मंडळी

By  
on  

पुण्यात काही दिवसांपुर्वी 'सविता भाभी... तू इथंच थांब' असं लिहिलेलं पोस्टर लागले होते. सविता भाभी या नावाचा भलताच संदर्भ असल्याने एरवी नाकासमोर चालणारे पुणेकर चोरुन का होईना या पोस्टरकडे पाहात होते. हे पोस्टर कशासंदर्भात असतील याची चर्चा सुरु असतानाच यामागचे लोक समोर आले आहेत. 

 

 

यामागे आहेत ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’. हे कोणतंही मंडळ नाही तर हा सिनेमा आहे. या सिनेमात पर्ण पेठे, अभय महाजन आणि सई ताम्हणकर, अक्षय टांकसाळे हे कलाकार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन आलोक राजवाडे करत आहे. या सिनेमाचा टीजर नुकताच समोर आला आहे. या एका ब्लॅक स्क्रीनच्या पार्श्वभूमीवर सईचा आवाज ऐकू येते. ‘हॅलो मी सविता...... अशी व्हिडियोची सुरुवात होते. त्यानंतर यात अभयचा आवाजही ऐकू येतो. एकंदरीत या टीजरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. हा सिनेमा 6 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

Loading...
Share