'नांदा सौख्य भरे' या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री ऋतुजा बागवे ही सध्या रंगभूमीवर आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवतेय.तिच्या अनन्या नाटकामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नेहमीच सोज्वळ आणि संस्कारी भूमिका साकारणा-या ऋजूताच्या ग्लॅमरस फोटोंची सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा रंगली होती. तिचा हा वेगळा आणि हटके अंदाज चाहत्यांनासुध्दा भावला आहे.
ग्लॅमरस शॉर्ट ड्रेसमध्ये ऋतुजा खुपच हॉट दिसतेय. 'अनन्या'साठीच्या अतुलनीय अभिनयासाठी आजवर तिचा अनेक प्रतिष्ठीत पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे.
ऋतुजाच्या ग्लॅमरस लुकवर फक्त चाहत्यांनीच लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केला नाहीय, तर सिनेसृष्टीतल्या सर्वच अभिनेत्रींनी पसंतीची पावती दिलीय. तेजस्विनी पंडीत, अमृता खानविलकर, गायत्री दातार, मिताली मयेकर या सा-याच जणी तिच्या या ग्लॅमरस अंदाजावर फिदा झाल्या आहेत.
‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’नंही ऋतुजाच्या यशाची दखल घेतली आहे. 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्'मध्ये ‘मोस्ट अॅवॉर्ड्स फॉर अ परफॉर्मन्स इन द इयर’ हे आंतरराष्ट्रीय टायटल तिने मिळवले आहे.
अलिकडेच तिचा 'भाई कोतवाल' हा ऐतिहासिक सिनेमा रसिकांच्या भेटीला आला होता. या स्वातंत्र्यसेनानीच्या आयुष्यावर बेतलेल्या सिनेमात तिने 'भाई कोतवाल' यांची पत्नी इंदू कोतवाल ही व्यक्तिरेखा साकारली.