By  
on  

चिराग पाटील आणि सिध्दी पाटणेचा अॅक्शन पॅक ड्रामा येतोय तुमच्या भेटीला

माजी क्रिकेटर संदीप पाटील यांचा मुलगा चिराग पाटील आता आपली स्वतंत्र ओळख सिनेसृष्टीत निर्माण करु पाहतोय. 83 द फिल्म या बहुचर्चित आगामी बॉलिवूड सिनेमात आपल्या वडिलांचीच  भूमिका साकारणा-या चिरागकडे सध्या सर्वांचं लक्ष असतानाच त्याने या सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच आपल्या नवीन मराठी सिनेमाची घोषणासुध्दा केली आहे. चिरागने सोशल मिडीयावरुन आपल्या नव्या सिनेमाची माहिती चाहत्यांसोबत सोशल मिडीयावरुन शेअर केली. या सिनेमात चिरागसोबत नायिका म्हणून गोव्याच्या किना-यावर फेम अभिनेत्री सिध्दी पाटणे झळकते आहे. 

चिराग आपल्या नव्या सिनेमाबाबत बोलताना म्हणतो, " 'काहीतरी नवीन घेऊन येतोय मित्रांनो, यात अॅक्शन ाहे, ड्रामा आहे, रोमान्स आहे, ट्रॅजेडी आणि कॉमेडी पण आहे बोले तो एकदम मसाला फिल्म आहे, लवकरच नवीन अपडेट्स याबाबत तुमच्यापर्यंत पोहचवू" . सर्वांनाच चिरागच्या या नव्या सिनेमाची आता उत्सुकता लागून राहिली आहे. 

चिराग वडील संदीप पाटील यांची भूमिका साकरत असलेल्या  ‘83 द फिल्म’ हा बहुप्रतिक्षीत सिनेमा येत्या 10 एप्रिल 2020 रोजी प्रदर्शित होत आहे. या सिनेमात कपिल देवची भूमिका बॉलिवूडचा एनर्जी मॅन रणवीर सिंह साकारतोय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive