By  
on  

स्वप्निल जोशीच्या बळीचं शूटींग झालं पूर्ण, म्हणतो " भीती तुमच्यापर्यंत पोहचवण्यास उत्सुक"

अभिनेता स्वप्निल जोशी यंदा 2020 रोजी सिनेरसिकांसाठी आपल्या सिनेमांची हटके पर्वणी घेऊन येणार आहे. सर्वांनाच तो करत असलेल्या नव्या प्रयोगाची उत्सुकता लागून राहिली आहे. प्रथमच तो एक भयपट घेऊन प्रेक्षकांसमोर येतोय. त्याची नेहमीची चॉकलेट बॉय आणि रोमॅंटीक हिरोची इमेज स्व:ताच मोडीत काढण्याचा घाट त्याने घातला आहे. 

मागच्या वर्षी स्वप्निलने नोव्हेंबरमध्ये 'बळी' या त्याच्या पहिल्या वहिल्या भयपटाचं पोस्टर सोशल मिडीयावर शेअर करत चाहत्यांना सिनेमाची माहिती दिली होती. आता नुकतंच त्याने या सिनेमाचं शूटींग संपलं असून सिनेमा पोस्ट प्रोडक्शनच्या प्रक्रियेतून जात असल्याचं म्हटलं आहे. तसंच हा सिनेमा गूढ, जादूई आणि भय या सर्वांचं एकत्रित मिश्रण आहे. तसंच हा सिनेमा करणं हे माझ्यासाठी भितीदायक अनुभव होता आणि ती भीती तुमच्यापर्यंत आणण्यास मी खुप उत्सुक असलयाचं स्वप्निलने सोशल मिडीयावरुन खास अधोरेखित केलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

I promised in the beginning of 2020 that this year is gonna be the year of experiments. One of those experiments was to enter the "Horror" genre. I'm extremely happy to announce that soon this experiment is gonna bear fruits. It's a wrap on "बळी” (Victim). I must say it's been a really wonderful journey with awesome companionship of @gseamsak @arjunsbaran & @kartiknishandar. @furia_vishal 's passionate and visionary direction really bought everyone together and we've created a film that's mystical & magical yet horrifying & scary at the same time. The movie is now in it's post-production stage आणि आम्ही लवकच तुमच्या भेटी साठी येणार आहोत. It's been an extremely scary experience for me. Can't wait to pass on the scares to you guys . Soon.

A post shared by SWWAPNIL JOSHI (@swwapnil_joshi) on

पूजा सावंत स्टारर सुपरहिट 'लपाछपी' या भयपटाचे दिग्दर्शक विशाल फुरिया यांनी 'बळी'या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.  त्याचबरोबर 'क्रिमिनल जस्टीस' या गाजलेल्या वेबसिरीजचे दिग्दर्शनदेखील विशाल फुरीया यांनी त्रिंगमांशू धुलिया यांच्याबरोबर केले होते.

बळी'ची निर्मिती ‘जीसिम्स’ (ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेन्मेंट अँड मिडिया सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड)च्या अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार यांनी केली आहे

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive