अजब पैजेची मजेशीर गोष्ट दिसतीये ‘बोनस’ च्या ट्रेलरमध्ये

By  
on  

अजोबांसोबत लावलेली हटके पैज जिंकण्यासाठी नातू काय काय करतो ते आगामी ‘बोनस’ सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे. हा सिनेमा रंगीबेरंगी आणि सदाबहार अशा कोळीवाड्याच्या पार्श्वभूमीवर दिसत आहे. आजोबांसोबत सर्वसामान्य आयुष्य जगण्याची पैज लावलेला आदित्य कोणत्या कोणत्या समस्यांना तोंड देतो हे या ट्रेलरमधून दिसतं. अगदी पाण्यापासून ते राहण्यापर्यंतच्या समस्यांना त्याला तोंड द्यावं लागतं. यात त्याच्यात काय बदल होतो ते सिनेमात दिसेल.

 

 

या सिनेमाचं दिग्दर्शन युवा दिग्दर्शक सौरभ भावे याने केलं आहे. गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत ही जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र येत असल्यानेही या चित्रपटाबद्दल लोकांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.  निर्माते अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशानदार हे ‘लायन क्राऊन एंटरटेन्मेंट’, गोविंद उभे, एन अनुपमा आणि कांचन पाटील यांच्यासोबत या सिनेमाची सहनिर्मिती करत आहेत. ‘लायन क्राऊन एंटरटेन्मेंट’ आणि ‘जीसिम्स’ यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सौरभ भावे केलं आहे. ‘बोनस’  हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात २८ फेब्रुवारी २०२० रोजी प्रदर्शित होत आहे.

Recommended

Loading...
Share