‘पांघरुण’ सिनेमा झळकणार बेंगळुरू आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल २०२०मध्ये

By  
on  

अलीकडेच काहीसं हटके कथानक असलेला ‘पांघरुण’ सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. लहान वयातील मुलीचा दोन मुलीचा बाप असलेल्या प्रौढ व्यक्तीशी विवाह होतो. पण नंतर कथानकात अनपेक्षित वळण येतं. या सिनेमाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोचला आहे. हा सिनेमा बेंगळुरू आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल २०२०मध्ये दिसणार आहे. या सिनेमात महेश यांची मानसकन्या गौरी इंगवले सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

 

 

तिच्यासोबत या सिनेमात अमोल बावडेकर आणि रोहीत फाळके दिसत आहेत. हा सिनेमा पहिल्यांदा 'मामि'त प्रदर्शित झाला. आता बेंगळुरू आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकणार असल्याने सिनेमाला वेगळी उंची मिळेल.

Recommended

Loading...
Share