शिवजयंती Special: शिवजयंतीला ही गाणी तुम्हाला स्फुर्ती देतील यात शंका नाही

By  
on  

प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असा राज्यकर्ता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांची जयंती महाराष्ट्रात अगदी सणासारखी साजरी केली जाते. सिनेसृष्टीनेही महाराजांच्या उत्तुंग कार्याची दखल घेतली आहे. मराठी सिनेमातही अनेक अशी गाणी आहेत जी तुमचं शिवजयंतीचं सेलिब्रेशन अधिक स्फुर्तीदायी बनवतील. 

ओ राजे: 
मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ! या सिनेमाने प्रत्येकाच्या मनात घर केलं आहे. या सिनेमातील ‘ओ राजे....’ हे गाणं आजही तितकंच ताजं आणि स्फुर्तीदायी वाटतं. सुखविंदर सिंग यांच्या पहाडी आवाजात हे गाणं ऐकण्याची मजा काही औरच आहे. 

 

जगदंब: 
मि. अ‍ॅण्ड मिसेस सदाचारी या सिनेमातील हे गाणं एक उत्तम डान्सिंग नंबर देखील आहे. वैभव तत्वावादी अभिनीत या गाण्याला आदर्श शिंदे यांनी आवाज दिला आहे. 

शिवबा आमचा मल्हारी: 
मराठी जनांचा स्वामी असलेल्या शिवबांना या गाण्याने योग्य अशी मानवंदना दिली आहे. फर्जंद सिनेमातील या गाण्याला प्रसाद ओक, अजय पुरकर, निखिल राउत, हरिष दुधाडे आणि सचिन देशपांडे यांनी आवाज दिला आहे. 

बघतोस काय मुजरा कर: 
छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा डोळ्यासमोर आली तरी मान गर्वाने ताठ होते. नजरेत वेगळीच चमक येते. नेमके हेच भाव ‘बघतोस काय मुजरा कर’ या सिनेमातील हे गाणं ऐकताना येतात. 

रणी फडकती लाखो झेंडे: 
महाराजांच्या स्तुतीपर गाण्यामध्ये या गाण्याचा समावेश आवर्जून करावा लागेल. फत्तेशिकस्त सिनेमातील हे गाणं प्रत्येकामध्ये जोश भरेल असंच आहे. अजय पुरकर आणि आशुतोष मुंगळे यांनी या गाण्याला आवाज दिला आहे.

Recommended

Loading...
Share