पाहा Photos : निखिल चव्हाण सांगतोय, 'उगाच तर्क लावत बसू नका..... फसशिला'

By  
on  

 'लागीरं झालं जी' मालिकेमधील विक्क्या उर्फ फौजी विक्रम तर त्याच मालिकेतील जयडी याचं नेमकं काय सुरु आहे, याची काही कल्पना नाही बुवा.हे दोघं म्हणजेच अभिनेता निखिल चव्हाण आणि अभिनेत्री पूर्वा शिंदे यांचं एक स्पेशल फोटोशूट सध्या व्हायरल होत आहे. ते पाहून त्या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे.  तुम्हालासुध्दा ते सुंदर फोटोशूट पाहून त्यांनी लग्न तर केलं नाही ना असंच वाटेल. 

निखिल चव्हाणने त्याच्या इन्स्टाग्राम हॅण्डलवरुन त्याचे आणि पूर्वासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत आणि त्याला भन्नाट कॅप्शनही दिलंय. " उगाच तर्क लावू नयेत....अजून सांगतोय उगाच तर्क लावत बसू नका..... फसशिला... जाऊदेत काय समजायचं ते समजा" . हे फोटो पाहून त्यांनी वेडींग फोटोशूट केल्याचं लक्षात येत आहे.  

एखाद्या ब्रॅण्डसाठी किंवा आगामी प्रोजेक्टसाठी त्यांचं हे फोटोशूट असू शकतं पण चाहते मात्र यामुळे चांगलेच बुचकळ्यात पडले आहेत. 

निखिलचे फोटोशूट हे नेहमीच चाहत्यांसाठी एक पर्वणी ठरते. यापूर्वी त्याने खास शेतक-यांना समर्पित करणारं फोटोशूट करुन सर्वांच्या पसंतीची पावती मिळवली होती. 

अभिनेत्री पूर्वा शिंदे ही सध्या झी युवा वाहिनीवरील युवा डान्सिंग क्विन कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. तर निखिल अनेक वेबसिरीज, मालिका आणि सिनेमांमधून रसिकांच्या भेटीला येतो. 

Recommended

Loading...
Share