'माझ्या नव-याची बायको'मधील सौमित्रची खरी बायको आहे ही अभिनेत्री

By  
on  

'माझ्या नव-याची बायको'मधील सौमित्र हा मनमिळावू ,समजूतदार आणि एक जबाबदार पती अशी व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता म्हणजे अद्वैत दादरकर. मालिकेत तो राधिकाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असतो. तिच्या प्रत्येक वाईट प्रसंगात तिला साथ देतो. असं हे पात्र साकारणा-या अव्दैत दादरकरची पत्नीसुध्दा एक सुंदर आणि प्रसिध्द अभिनेत्री आहे. 

अव्दैत दादरकरच्या अभिनेत्री पत्नीचं नाव आहे , भक्ती देसाई. सध्या ती 'तू म्हणशील तसं' या नाटकातून रसिकांची मनं जिंकतेय. संकर्षण क-हाडेसोबत तिची अफलातून केमिस्ट्री पाहायला मिळतेय  आणि भक्तीच्या अभिनयाचं कौतुकही होतंय. या नाटकाचं दिग्दर्शन प्रसाद ओकने केलं आहे तर निर्मिती अभिनेते प्रशांत दामले यांनी केलीय. 

झी युवावरील अंजली मालिकेतसुध्दा भक्तीने डॉ. रोहिणी ही व्यक्तिरेखा रंगवली होती. तर यापूर्वी झी मराठीवरील अरुंधती या प्रसिध्द मालिकेत तिने नायिका साकरली होती. 

अद्वैत आणि भक्ती यांना एक गोंडस मुलगी असून दोघंही सोशल मिडीयाच्या माध्यमातून सक्रीय असतात. 

Recommended

Loading...
Share