पाहा Photo : राणा डग्गुबतीने शेअर केलं श्रिया पिळगावकरचं हे पोस्टर

By  
on  

महागुरुंची एकुलती एक लेक श्रिया पिळगावकर हिंदी सिनेलृष्टीत आपली नवी ओळख निर्माण करु पाहातेय. 'फॅन'मध्ये शाहरुख खानसोबत स्क्रिन शेअर करुन लक्षवेधी ठरल्यानंतर  श्रियाची महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या मिर्झापूर वेबसिरीजला रसिकांची चांगलीच पसंती मिळाली आणि एवढंच नाही तर तिच्या कामाचंसुध्दा विशेष कौतुक झालं. आता श्रिया दाक्षिणात्या सिनेमात पदार्पण करते व तेसुध्दा दाक्षिणात्य सुपरस्टार राणा डग्गुबतीसह.

राणाने श्रियाचा आगामी सिनेमा ‘हाती मेरे साथी’मधील पोस्टर त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. तसेच हे पोस्टर शेअर करताना श्रिया एक अप्रतिम सहकलाकार आहे. तसेच दाक्षिणात्य सिनेसृष्टीमध्ये तिचे स्वागत असे त्याने कॅप्शन दिले आहे.यावरुनच राणालासुध्दा मराठमोळ्या श्रियाचं किती कौतुक आहे, हे दिसतं. 

‘हाती मेरे साथी’ या चित्रपटात राणा डग्गुबती, पुलकीत सम्राट, झोया हुसैन यांच्यासोबत श्रिया झळकणार आहे, पण तिच्या नेमक्या भूमिकेची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. जंगल वाचवा, प्राणी वाचवा अशा आशयावर हा सिनेमा बेतल्याचं समजतं. 

Recommended

Loading...
Share