सत्य, असत्य, काल्पनिक... की काल्पनिक सत्य ? याचा उलगडा ‘अश्लिल उद्योग मित्र मंडळ’ सिनेमातूनच होईल. या सिनेमातून सविता भाभीच्या रुपात आहे अभिनेत्री सई ताम्हणकर. हे काल्पनिक पात्र सिनेमात कोणत्या वेळी येतं ? या पात्रामुळे नेमकं काय घडतं ? या सगळ्या गोष्टी सिनेमात पाहणं रंजक ठरेल. याच सिनेमातील ‘सविता भाभी तू इथचं थांब’ हे गाणं नुकतच प्रदर्शित करण्यात आलय. 'सविता भाभी' हे एक कॉमिक कॅरेक्टर आहे. यावरुनच सिनेमात हे पात्र घेण्यात आलय.
या सिनेमाचा दिग्दर्शक आलोक राजवाडेने हे गाणं गायलय. साकेत कानेटकरने हे गाणं लिहीलय आणि या गाण्याला संगीतही दिलय. या गाण्यात सई ताम्हणकर, अभय महाजन, पर्ण पेठे, अमेय वाघ पाहायला मिळत आहेत. शिवाय सायली फाटक, अक्षय टंकसाळे, ऋतुराज शिंदे, विराट मडके, केतन देसाई ही स्टारकास्टही सिनेमात आहे.
मात्र याच गाण्याच्या ओळी काही दिवसांपूर्वी पुण्याच्या गल्लीत, रस्त्या रस्त्यांवर असलेल्या होर्डिंग्जवर पाहायला मिळाल्या होत्या. त्याची प्रचंड चर्चाही झाली होती.
येत्या 6 मार्च रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.