पाहा Photos : मृण्मयी देशपांडेची ग्लॅमरस बहिण गौतमी देशपांडे

By  
on  

मराठीतील गुणी अभिनेत्री म्हणून मृण्मयी देशपांडे लोकप्रिय आहे. तिच्या अभिनयाचं नेहमीच कौतुक होतं. मालिका असो वा सिनेमा मृण्मयी तिच्या अभिनयाचा ठसा उमटवतेय. इतकंच नाही तर, मन फकीरा या सिनेमाचं दिग्दर्शन तिने केलं आहे, हा सिनेमा येत्या 6 मार्चला रसिकांच्या भेटीला येतोय. पण आता आपण मृण्मयीबद्दल नाही तर तिच्या बहिणीबद्दल जाणून घेणार आहोत.

मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे या दोघी सख्या बहिणी असून हुबेहूब एकमेकांसारख्या दिसतात

मृण्मयी इतकीच टॅलेंटेड तिची बहिण गौतमी देशपांडे आहे. लवकरच झी मराठीवरील 'माझा होशील ना' या  मालिकेत ती मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा अभिनेता विराजस कुलकर्णीसोबत झळकतेय. 

गौतमीने  यापूर्वी सोनी मराठीवरील सारे तुझ्याचसाठी या मलिकेतही नायिका साकारली आहे.  

गौतमी उत्तम गायिकासुद्धा आहे. तिने मन फकीरा सिनेमासाठी पार्श्वगायनसुध्दा केलं आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#Repost @celebrity_promoters with @get_repost ・・・ *‘सारे तुझ्याच साठी’ मध्ये साजरी होणार श्रुती आणि कार्तिकच्या लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत* सोनी मराठीवरील ‘सारे तुझ्याच साठी’ मालिकेला प्रेक्षकांनी पहिल्या एपिसोडपासून ते आताच्या एपिसोडपर्यंत भरभरुन प्रेम दिलं आहे. या मालिकेतील श्रुती आणि कार्तिकची जोडी, त्यांचा मैत्री ते लग्नापर्यंतचा प्रवास, दिवसेंदिवस त्यांचे एकमेकांवरचे वाढणारे प्रेम, विश्वास, कडू-गोड आठवणी, अप्स अँड डाऊन परिस्थितीत पण एकमेकांची असणारी सोबत या सर्व गोष्टींचा साक्षीदार बनलेल्या प्रेक्षकांनी या मालिकेला नेहमीच पसंती दर्शवली आहे. महाराष्ट्राने श्रुती आणि कार्तिकच्या लग्नसोहळ्याचा खास आनंद घेतला. लग्नानंतर श्रुती आणि कार्तिकची जुळलेली केमिस्ट्री प्रेक्षकांची या मालिकेप्रती उत्सुकता वाढवत होती. नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. या सणाच्या निमित्ताने ‘सारे तुझ्याच साठी’ मध्ये काय पाहायला मिळणार याची आतुरता प्रेक्षकांना नक्कीच असणार. मकर संक्रांत म्हटंलं की पहिली गोष्ट आठवते ती म्हणजे तीळगुळाचे लाडू. ‘तीळगूळ घ्या गोड गोड बोला’ हे प्रत्येकजण तीळगूळ देताना बोलतो… आता या सणाच्या निमित्ताने ‘सारे तुझ्याच साठी’ च्या कुटुंबातील गोडवा आणि प्रेम अजून वाढणार. तीळगुळाची तयारी तर जोरात सुरु झालीच आहे. तसेच या वर्षाची मकर संक्रात ही श्रुती आणि कार्तिकच्या लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत आहे. या सणाला अजून प्रेमळ बनवण्यासाठी कार्तिक श्रुतीला ‘काळ्या रंगाची साडी’ गिफ्ट म्हणून देणार आहे. हलव्याच्या दागिन्याने नटलेली आणि काळ्या रंगाची साडी नेसलेली आपल्या बॉक्सिंग चॅम्पियन श्रुतीला पाहिल्यावर कार्तिक तर पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडेलच, पण महाराष्ट्रालाही या जोडीवर आणि मालिकेवर पुन्हा एकदा प्रेम करण्यासाठी आणखी एक कारण नक्कीच मिळेल. मकर संक्रांत स्पेशल ‘सारे तुझ्याच साठी’चा खास एपिसोड पाहा फक्त सोनी मराठीवर. #saretujhyachsathi #Makarasankranti #specialepisode #shrutik #ShrutiKartik #SonyMarathi @harshad_atkari @gautami.v.deshpande @mediabuzzpr @sonymarathi @wanderlust_2013 P.C. @maujoshi

A post shared by Gautami Deshpande (@gautamideshpandeofficial) on

Recommended

Loading...
Share