‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेतील या अभिनेत्रीविषयी ही गोष्ट तुम्हाला माहित आहे का ?

By  
on  

शिवा आणि सिद्धी ही जोडी सध्या मराठी टेलिव्हिजनवर चर्चेत आहे. मात्र या मालिकेतील सिद्धी म्हणजेच विदुला चौगुलेविषयीची ही गोष्ट सध्या चर्चेत आली आहे. विदुलाने अगदी लहान वयातचं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे.


विदुलाची ही पहिलीच मालिका असून पहिल्याच ऑडिशनमध्ये विदुलाची लीड भूमिकेसाठी निवड झाली होती. मात्र या मालिकेची निवड झाली तेव्हा विदुला तिचं शालेयं शिक्षण पूर्ण करत होती. नुकतीच तिने दहावीची परिक्षा दिली आहे. 
लहानपणापासूनच विदुलाची अभिनय क्षेत्रात जाण्याची आवड होती. 


विदुलानं याआधी 'डाग' नावाच्या लघुपटात काम केलं आहे. शिवाय आदिंबाच्या बेटावर, गणपती बाप्पा हाजीर हो, झाडावाली झुंबी, राखेतून उडाला मोर, सारं कसं शांत शातं, माता द्रोपदी या नाटकांमद्धे कामं केली आहेत. विदुला इयत्ता तिसरीपासून अभिनयाचे धडे गिरवत आहे. सुरुवातीपासूनच अभिनय क्षेत्रात काम करण्याची विदुलाची इच्छा होती. 


सोशल मिडीयावर विदुलाचे अनेक फोटो चर्चेत असतात. शिवाय पहिल्याच मालिकेतून ती प्रसिद्ध झाली असून इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत. 
 

Recommended

Loading...
Share