सुबोध भावेच्या मुलांनी मराठी भाषा दिनाच्या अशा दिल्या शुभेच्छा 

By  
on  

ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. आणि याच मराठी भाषा दिनानिमित्त बऱ्याच मराठी कलाकारांनी सोशल मिडीयाच्या माध्यामातून शुभेच्छा दिल्या आहेत.यातच अभिनेता सुभोध भावेने एक व्हिडीओ पोस्ट करुन मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करत हा व्हिडीओ सुबोधने पोस्ट केला आहे.

या व्हिडीओत सुबोध आणि मंजिरी भावे यांची दोन्ही मुलं मल्हार आणि कान्हा दिसत आहेत. प्रसिद्ध कवी कुसुमाग्रज यांची ‘आनंदलोक’ ही कविता या दोघांनी म्हटली आहे. या गोंडस शुभेच्छांना सोशल मिडीयावर जोरदार प्रतिसाद मिळत असून कमेंट्सचाही वर्षाव होतोय. 

सुबोधचा मोठा मुलगा कान्हा हा ‘उबंटू’ आणि ‘अगडबम’ या सिनेमांमध्ये झळकला होता.

तर धाकटा मुलगा मल्हारने ‘तुला पाहते रे’ या मालिकेत सुबोध भावेच्या पात्राची लहानपणीची भूमिका साकारली होती.

  तेव्हा सुबोध भावे यांची दोन्ही मुलं वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवताना दिसत आहेत. 


 

Recommended

Loading...
Share