नेहमी बोल्ड अंदाजात असणा-या रसिका सुनिलचा हा मराठमोळा साज पाहिलात का? - Rasika Sunil's New Photoshoot

By  
on  

नेहमीच आपल्या ग्लॅमरस आणि हॉट अवतारातून चाहत्यांना क्लिन बोल्ड करणारी तुमची लाडकी शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनीलने चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. रसिकाने नुकताच नऊवारी साडी आणि मराठमोळा साज लेवून एक फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करत चाहत्यांना घायाळ केलं आहे.

आत्तापर्यंत रसिकाचे अनेक बोल्ड फोटो तिने शेअर केले, त्यातील तिच्या हॉट बिकीनी फोटोशूटची बरीच चर्चा झाली. तिने या जबरदस्त लुकसाठी बरीच मेहनत घेतली होती. 

काही दिवसांपूर्वीच रसिकाचा पहिला वहिला हिंदी व्हिडीओ अल्बमसुध्दा रिलीज झाला.  

अलिकडेच गॅट-मॅट आणि गर्लफ्रेंड या सिनेमांमध्ये रसिका झळकली होती. आता तिच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.  

माझ्या नव-याची बायको मालिकेतील शनाया म्हणून रसिका घरोघरी पोहचली.  

 

Recommended

Loading...
Share