अमृता  खानविलकर आणि पुष्कर जोग यांचा रोमॅण्टीक कॉमेडी 'वेल डन बेबी' या दिवशी रसिकांच्या भेटीला

By  
on  

आनंद पंडित मोशन पिक्चर्स , प्रॉडक्शन हेड क्वार्टर्स यूके आणि गूसबम्प्स एंटरटेनमेंट यांची संयुक्त निर्मिती असलेला तसेच पुष्कर जोग व अमृता खानविलकर यांची प्रमुख भूमिका असलेला  बहुचर्चित चित्रपट वेल डन बेबी १२ जून जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे . 
या चिटापटाबद्दल नेटकऱ्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झालीये कारण पुष्कर जोग आणि अमृता खानविलकर हे पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत . सोशल मीडियावर त्यांचे शूटिंग चे फोटोज व्हायरल झाले आहेत . 

वेल डन बेबी चे कथानक हे आजच्या आधुनिक तरुण जोडप्याभोवती फिरत आहे, जे त्यांच्या नात्यातला हेतू शोधण्यात अपयशी ठरतात , पण नशिबाने त्यांना आणखी एक संधी मिळते .

वेल डन बेबी चे दिग्दर्शन प्रियंका तंवर यांनी केले आहे,आनंद पंडित , मोहन नाडर आणि पुष्कर जोग निर्माते आहेत तर प्रमुख भूमिकेत  पुष्कर जोग , अमृता  खानविलकर  आणि  वंदना  गुप्ते आहेत .

Recommended

Loading...
Share