By  
on  

पाहा Video : ..... आणि अमृताच्या आईने लावला कपाळाला हात

मराठीतील हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. सध्या ती खतरों कें खिलाडी 10' या रिएलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालीय. मराठमोळ्या अमृताचा हा खतरोंचा स्वॅग पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक होते. पण मालिका आणि सिनेमांमध्ये नेहमीच आघाडीवर असणा-या अमृताचे खतरों के खिलाडीमधील स्टंट्स पाहून तिच्या आईच्या  जीवाला मात्र चांगलाच घोर लागला. तिने कपाळाला हातच लावून घेतला. 

अमृता ही मराठी कलाविश्वातील पहिली अभिनेत्री आहे, जी या स्टंट् रिएलिटीशोमध्ये सहभागी झालीय. त्यामुळे तिची जोरदार चर्चा सुरु आहे.काही दिवसापूर्वीच सुरु झालेल्या या पर्वामध्ये अमृता वेगवेगळे स्टंट करताना दिसत आहे. मात्र ती ज्या जिद्दीने जीवावर बेतणारे स्टंट करत आहे ते पाहून तिच्या आईने चक्क डोक्याला हात लावल्याचा व्हिडीओ खुप व्हायरल होत आहे. 

'चोरीचा मामला' या मराठी सिनेमातून पुन्हा एकदा रसिकांवर जादू केल्यानंतर अमृताचा 'वेल डन बेबी' हा आगामी सिनेमा येत्या 12 जूनला चाहत्यांच्या भेटीला येत आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive