By  
on  

विक्रम गोखले यांचा हा लुक पाहून तुम्हाला होईल बिग बींच्या ‘दीवार’ सिनेमाची आठवण - Vikram Gokhale's New Look

एबी आणि सिडी या सिनेमाच्या निमित्ताने मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज कलाकार अभिनेता विक्रम गोखले आणि हिंदी सिनेमातील सुपरस्टार बिग बी अमिताभ बच्चन ही जोडी एकत्र पाहायला मिळणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला ज्यात बिग बींचा आवाज ऐकायला मिळतोय. या सिनेमाचा ट्रेलरही लवकरच प्रदर्शित होणार आहे. मात्र या सिनेमाच्या घोषणेपासूनच या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. त्याचं कारण आहे बिग बी अमिताभ बच्चन या सिनेमात झळकणार आहेत. याआधी केलेल्या एका सिनेमात बिग बी पाहुणे कलाकार होते. मात्र या सिनेमात बिग बी एका महत्त्वाच्या भूमिकेसह दिसतील. 


या सिनेमातील विक्रम गोखले यांचा नवा फोटो सध्या चर्चेत आहे. या फोटोत विक्रम गोखले हे बिग बी अमिताभ यांच्या प्रसिद्ध दीवार सिनेमातील भूमिकेच्या लुकमध्ये दिसत आहेत. दीवार सिनेमातील तसाच निळ्या रंगाचा शर्ट, खांद्यावर लटकवलेली सुतळी असा हुबेहुब लुक विक्रम गोखले यांनी केलाय. शिवाय एबी आणि सिडी सिनेमातील एका पोस्टरमध्ये बिग बींच्या याराना सिनेमातील सारा जमाना गाण्यातील लुकही विक्रम गोखले यांनी केलेला पाहायला मिळतोय. यात त्यांनी लाईट लावलेला जॅकेट घातलेला दिसतोय.

मात्र सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान बिग बींच्या सिनेमांमधील पेहरावाप्रमाणे विक्रम गोखले यांचे आणखी काही लुक्सही पाहायला मिळतील का याची वाट पाहायची आहे. 


मात्र या सगळ्या लुक्समागे नेमकं काय दडलयं हे सिनेमाच्या ट्रेलरमधून किंवा सिनेमातूनच पाहायला मिळेल एवढं नक्की. 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive