मराठीतला हॅण्डसम हिरो म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजे प्रसिध्द डॅशिंग अभिनेते अजिंक्य देव यांचं तब्बल चार वर्षानंतर मराठी सिनेमात कमबॅक होत आहे. ते मोठ्या पडद्यावरुन सतत रसिकांच्या भेटीला येत. पण ते बॉलिवूड सिनेमांमधून. अलिकडेच प्रदर्सित झालेल्या तान्हाजी द अनसंग वॉरियर सिनेमातील त्यांची भूमिका लक्षवेध ठरली. 2016 साली प्रदर्शित झालेल्या नागपूर् अधिवेश या सिनेमानंतर ते आता 'झोलझाल' या मराठी सिनेमातून ते कमबॅकसाठी सज्ज झाले आहेत. हा विनोदी सिनेमा आहे.
अजिंक्य देव 'अभिमन्यू शिंदे' या एका प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. प्रदीर्घ काळानंतर प्रेक्षकांना अजिंक्य देव महत्वाच्या आणि मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने अजिंक्य देव यांच्या अभिनयाचे वेगवेगळे पैलू रसिकांना पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाविषयी बोलताना अजिंक्य देव म्हणतात, " मराठीत बऱ्याच दिवसांनी काम करताना खूप आनंद होतोय. माझ्या इतर प्रोजेक्ट्समुळे व्यस्त असलेलो मी गेली काही वर्षे मराठी चित्रपटापासून दूर होतो. मराठी चित्रपट तर नक्कीच करायचा होता. मात्र मला हवी तशी भूमिका मिळत नव्हती. मी अशा भूमिकेची वाट बघत होतो जी माझ्यासाठीच बनली असेल. 'झोलझाल' चित्रपटाच्या निमित्ताने माझी ही इच्छा पूर्ण झाली
अजिंक्य देव पुढे सांगतात," या चित्रपटाच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा अँक्शन करताना दिसणार आहे.माझ्यावर नेहमीच प्रेक्षकांनी प्रेम केलं आहे आणि 'झोलझाल' निमित्ताने ते अजून वाढेल असे वाटते." सर्वांनाच अजिंक्य देव यांच्या या मराठी सिनेमाची उत्सुता लागून राहिली आहे.
मानस कुमार दास दिग्दर्शित 'झोलझाल' येत्या १ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.