By  
on  

सई मांजरेकरच्या बॉलिवूड पदार्पणाचा निर्णय होता या अभिनेत्याचा, महेश मांजरेकरांचा खुलासा

अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकरांची मुलगी सई मांजरेकर हिने अलीकडेच दबंग 3 मधून बॉलिवूड पदार्पण केलं. या सिनेमात सलमान आणि सईची केमिस्ट्री चाहत्यांना आवडली. या सिनेमाने चांगला गल्लाही मिळवला. महेश मांजरेकर यांनी मात्र लेकीच्या पदार्पणाबाबत आताच खुलासा केला आहे. सईच्या पदार्पणाचा निर्णय हा महेश यांचा नव्हता तर सलमानचा होता. एका हिंदी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये महेश यांनी हा खुलासा केला. 

महेश आणि सलमान एकमेकांचे चांगले मित्र असल्याने सलमानच्या या निर्णयाला महेश यांनी नकार देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. सलमान कलाकार म्हणून चांगला आहेच. याशिवाय माणूस म्हणूनही तो उत्तम आहे. अर्थात महेश यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला असता तर सईला ही भूमिका नक्कीच दिली नसती असंही त्यांनी नमूद केलं.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive