By  
on  

'का रे दुरावा' फेम सुरुची अडारकरचा बॉक्सिंग करतानाचा हा जबरदस्त फोटो होतोय व्हायरल

'का रे दुरावा'तील अदिती म्हणजेच अभिनेत्री सुरुची अडारकरने  रसिकांच्या  मनावर अधिराज्य गाजवलं. नेहमीच सोज्वळ आणि सिंपल पण बेस्ट लुकमध्ये दिसणा-या सुरुचीचा एक फोटो नुकताच सोशल मिडीयावर बराच व्हायरल होत आहे. किक बॉक्सिंग करतानाचा एक जबरदस्त ब्लॅक आणि व्हाईट फोटो सुरुचीनेच सोशल मिडीयावरुन शेअर केला आहे. या फोटोत फिट आणि फाईन दिसण्याबरोबरच चाहत्यांना फिटनेस गोल्स देणा-या सुरुचीच्या या फोटोंवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा चाहत्यांनी वर्षाव केला आहे. 

सुरुचीचं हे एक प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशनचं म्हणावं लागेल. प्रसिध्द सेलिब्रिटी फोटोग्राफर तेजस नेरुरकरने सुरुचीचं हे जबरदस्त फोटोशूट केलं आहे, 

 झी युवावरील अंजली ही सुरुचीची प्रमुख भूमिका असेलली मालिकासुध्दा प्रचंड गाजली. त्यानंतर तिने पुन्हा सुयश टिळकसोबत याच वाहिनीवरील 'एक घर मंतरलेलं' या रहस्यमयी मालिकेत न्यूज रिपोर्टरची भूमिका साकारली होती.  

 सुरुचीच्या आगामी प्रोजेक्ट्सची सर्वांना आता उत्सुकता लागून राहिली आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive