By  
on  

Video : भाऊ कदमने गाठली पन्नाशी, कुटंबिय आणि मित्रपरिवाने वाढदिवस दणक्यात केला सेलिब्रेट

विनोदांचा बादशाह व सर्वांचा लाडका  भाऊ कदमचा आज 50 वा वाढदिवस. सर्व कुटुंबिय आणि जवळच्या मित्र परिवाने भाऊचा हा 50 वा वाढदिवस त्यांना खास सरप्राईज देत रात्री 12 वाजता दणक्यात साजरा केला. यावेळी सर्वांनी एका ग्रॅण्ड पार्टीचं आयोजन केलं होतं. आपल्या विनोदांनी आणि कॉमेडीच्या अचूक टायमिंगमुळे नेहमीच रसिकांचं खळखळून मनोरंजन करणा-या भाऊ कदमसाठी आजचा दिवस खुप स्पेशल व्हावा यासाटी कुटुंबिय व मित्रपरिवाराने खुप छान पार्टीचं आयोजन केलं. 

आई आणि मुलांच्या साथीने केक कापताना भाऊ खुपच हळवा झाला होता. 

भाऊ कदमची त्याच्या या वाढदिवसाच्या पार्टीत एकदम ग्रॅण्ड एन्ट्री झाली. कुटुंबिय व मित्र परिवारासोबतच चाहत्यांकडून होणा-या शुभेच्छांच्या वर्षावा पाहून भाऊ खुपच भारावून गेला. त्याचा केकही खुप खास होता. त्यावर आठवणींचा कोलाज म्हणजेच फोटो कोलाज खुप सुंदररित्या पाहायला मिळालं. मराठीतले प्रसिध्द दिग्दर्शक-निर्माते रवी जाधव यांनी भाऊ कदमच्या वाढदिवसाच्या जंगी सेलिब्रेशनचा हा खास व्हिडीओ सोशल मिडीयावरुन शेअर केला आहे. 

 

पिपींगमून मराठीतर्फे विनोदांच्या या बादशाहला खुप खुप शुभेच्छा , रसिकांना तुम्ही असेच निखळ हसवत राहा व मनोरंजन करत रहा हीच सदिच्छा ! 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive