By  
on  

प्रेरणा देणारे विजेताचा टायटल ट्रॅक ऐकला का?

सुभाष घईंच्या मुक्ता आर्ट्सची निर्मिती असलेला ‘विजेता’ सिनेमाचा टायटल ट्रॅक नुकताच भेटीला आला आहे. ‘नवा जन्म घेई विजेता’ असे या गाण्याचे बोल आहेत. या सिनेमात जिंकण्यासाठी खेळाडूंची जीवतोड मेहनत दिसून येत आहे. या गाण्याला अवधुत गुप्ते याने आवाज दिला आहे. तर रोहन रोहन यांचं संगीत आहे. मंदार चोळकर यांनी या गीताचे बोल लिहिले आहेत.

 

 

या सिनेमात सुबोध भावे, पुजा सावंत, माधव देवचके, सुशंत शेलार, मानसी कुलकर्णी ,तन्वी किशोर,देवेन्द्र चौगुले, दिप्ती धोत्रे, क्रुतिका तुलसकर,आणि गौरीश शिपुरकर यांच्या भूमिका आहेत. बॉक्सिंग, ट्रायथलॉन ॲथलेटिक्स, वेटलिफ्टींग, गोळाफेक हे खेळ आणि त्याच्यांत सुवर्णपदक मिळवण्यासाठीची खेळाडू आणि त्यांचे कोच यांची जिद्द या सिनेमात पाहता येणार आहे. हा सिनेमा 12 मार्चला रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive