By  
on  

अरुंधती नाग तब्बल 40 वर्षांनंतर मराठी सिनेसृष्टीत, वाचा सविस्तर

सिने आणि नाट्यविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री अरूंधती नाग लॅन्डमार्क ‘मीडियम स्पाइसी’ ह्या सिनेमाव्दारे मराठी चित्रपटसृष्टीत परतणार आहेत. पद्मश्री अरूंधती नाग ह्यांनी सुमारे 40 वर्षांपूर्वी ‘22 जून 1897’ ह्या मराठी चित्रपटाव्दारे सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर आता विधि कासलीवाल निर्मित, मोहित टाकळकर दिग्दर्शित आणि इरावती कर्णिक लिखीत, ‘मीडियम स्पाइसी’ सिनेमातून त्या मराठीत परतणार आहेत.

अरूंधती नाग ह्यांच्या भूमिकेविषयी सांगताना दिग्दर्शक मोहित टाकळकर म्हणाले, “भूमिकेच्या लांबीपेक्षा कलाकृतीत समरसून व्यक्तिरेखेशी एकनिष्ठ राहण्याकडे त्यांचा कल असतो. त्या जरी मराठीत 40 वर्षांनी परतत असल्या तरीही, त्यांचे मराठीवर प्रभूत्व आहे आणि मुख्य म्हणजे सिनेमाच्या भाषेवर त्यांचे प्रेम आहे.चित्रपटाचे कथानक आकारत असताना, ‘लक्ष्मी टिपणीस’ह्या भूमिकेसाठी माझ्या डोळ्यांसमोर फक्त अरूंधती नाग ह्यांचीच प्रतिमा उभी राहिली. लक्ष्मी टिपणीस अतिशय प्रगल्भ आणि पुरोगामी स्त्री आहे. पण त्यासोबतच ती जेवढी बुध्दिमान आहे, तेवढीच तिच्यात मायेची उब आहे. सिनेमात जेव्हा लक्ष्मीची एन्ट्री होते, तेव्हा तिला पाहताच तिच्या चैतन्यमयी व्यक्तिमत्वाची जाणीव व्हावी, असं मला वाटलं. म्हणूनच अरूंधती ह्यांना ही भूमिका ऑफर केली.” 

मराठीतल्या आपल्या पुनरागमनाबाबत राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री अरूंधती नागही खूप उत्सुक आहेत. त्या मराठी सिनेसृष्टीत परण्याविषयी म्हणाल्या, “40 वर्षांनंतर मराठी सिनेसृष्टीत परतणं, ही निश्चितच आल्हाददायक गोष्ट आहे. परतताना एखाद्या नवोदितासारखी अनुभूती होतेय. बंगलोरला आमच्या रंगशंकरा नाट्यमंदिरात मोहित त्याच्या नाटकांचे प्रयोग करायला येत असतो. अशाच एका प्रयोगावेळी मोहित मला त्याच्यासोबत बसायची विनंती करत म्हणाला, अरू अक्का, मी लवकरच एक चित्रपट दिग्दर्शित करतोय. त्यामध्ये तू एक भूमिका करावीस, अशी माझी इच्छा आहे.”

अरूंधती नाग ह्यांना मोहितच्या कलाकृती आवडतात. त्यामूळे त्यांनाही मोहितच्या ह्या सिनेमाचा भाग होणं आवडलं. मोहितसोबतच ललित प्रभाकरचीही त्यांनी प्रशंसा केली.  

 

अरूंधती नाग ह्यांच्यासोबतचा अनुभव सांगताना निर्मात्या विधि कासलीवाल म्हणाल्या, “अरूंधती नाग ह्यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्रीसोबत काम करण्याची संधी मिळणे, हा आमचा गौरवच आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वात असलेली विनम्रता आणि आपुलकी ह्यामूळे त्या आसपासच्या प्रत्येक व्यक्तिला पटकन आपलंस करून घेतात. त्यामूळेच तर त्या एवढ्या ज्येष्ठ अभिनेत्री असूनही त्यांच्याशी पटकन ऋणानुबंध जुळून आला. अरूंधतीजी एवढ्या नैसर्गिक अभिनत्री आहेत, की त्या प्रत्येक शॉटमध्ये परफॉर्म करताना तुम्ही त्यांच्या अभिनयाने मोहित होऊन जाता.”

नागरी जीवनातल्या प्रेम, नातेसंबंध आणि लग्नसंबंधांवर प्रकाश टाकणारा सिनेमा आहे. ह्या चित्रपटात सई ताम्हणकर, ललित प्रभाकर, पर्ण पेठे, सागर देशमुख, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, इप्शिता, ह्या युवाकलाकारांसोबतच नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी हे ज्येष्ठ कलाकारही महत्वपूर्ण भूमिकांमधून दिसतील.

 

ल्रॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत ‘मीडियम स्पाइसी’ हा सिनेमा येत्या  5 जून 2020 रसिकांच्या भेटीला येत आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive