By  
on  

Video: समर आणि सुमीचा हा भन्नाट डान्स तुम्ही पाहिलात का ?

छोट्या पडद्यावरचे समर आणि सुमी ह्यांचं सध्या काय सुरू आहे, माहित नाही. पौराणिक रुपानंतर आता दोघंही जबरदस्त गावरान अंदाजात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. "मक्याच्या शेतात एकलीच होते ठाऊक नव्हतं मला..." या जबरदस्त गाण्यावर दोघंही तुफान थिरकतायत. 

'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेतल्या एका सिक्वेन्ससाठी या जोडीने ही खास वेषभूषा केल्याचं दिसतंय. त्यानुळे हा विशेष भाग पाहण्याची आता प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. 

मुख्यंमत्री होण्याचं स्वप्न पाहून जनहितासाठी धडपडणारा समर आणि प्रत्येक कठीण प्रसंगात त्याच्या पाठीमागे त्याला खंबीर साथ देणारी सुमी ह्यांची ही छोट्या पडद्यावरची कहाणी अल्पावधीतच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली.  प्रमुख भूमिका साकारणारे अमृता धोंडगे आणि तेजस बर्वे  ही जोडी सर्वांचीच लाडकी आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive