By  
on  

कुशल बद्रिके करतोय हा नवा 'झोलझाल', तुम्हाला माहितीय का?

मराठी मनोरंजनसृष्टीत विनोदाच्या अचूक टायमिंगसाठी ओळखला जाणारा विनोदवीर म्हणजे सगळ्यांचाच लाडका कुशल बद्रिके आगळ्यावेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. विनोदी मालिकेच्या निमित्ताने कुशल नेहमीच रसिकांना हसवत असतो. तसेच, अनेक चित्रपटांमध्ये तो वेगवेगळी पात्र साकारताना आपल्याला दिसतो. मात्र  'झोलझाल' या चित्रपटात कुशल चक्क एक खलनायक रंगवताना दिसणार असून या खलनायकाला विनोदाची साथ लाभली आहे. हा विनोदवीर खलनायकी भूमिकेत दिसणार आहे.

'डॉन दादाऊद कैउद्रे' असे कुशलच्या भूमिकेचे नाव असून, या डॉनला सुरु करायची आहे ती म्हणजे डॉन बनायचे प्रशिक्षण देणारी संस्था आणि त्यासाठी त्याला हवाय बंगला. हा बंगला मिळवण्यासाठी कुशल काय झोलझाल करतो?  हे तर आपल्याला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर समजेल. कुशल साकारत असलेला 'डॉन दादाऊद कैउद्रे'हा अमजद खानचा फॅन असल्याने त्याने परिधान केलेली वेशभूषा अमजद खान यांच्या  शोले, कुर्बानी, दादा आणि इन्कार या चित्रपटातील वेषभूषेशी मिळतीजुळती आहे. या चित्रपटात कुशलने अमजद खान यांचा आवाज न काढता ना त्यांची नक्कल करता एक वेगळाच अमजद खान आपल्या समोर साकारण्याचा प्रयत्न केला आहे. कुशल त्यांच्या या भूमिकेबद्दल सांगतो, "हा चित्रपट माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे.

चित्रपटाच्या दिग्दर्शकांचे नाव ऐकून माझ्या मनात जरा गोंधळ निर्माण झाला होता. मात्र चित्रपट करताना तो गोंधळ पूर्णपणे दूर झाला, मराठी नसूनही  इतक्या सहजपणे हा मराठी चित्रपट दिग्दर्शित करणं ही खरंच कौतुकास्पद बाब आहे. माझी भूमिका जरी अमजद खान यांच्यावर प्रेरीत असली तरी मी कुठेही त्यांना कॉपी केले नाही. मी माझा एक वेगळा अमजद खान प्रेक्षकांना दाखवणार आहे. हा चित्रपट करताना मला अजून एक जाणीव झाली ती म्हणजे, मराठी चित्रपट आणि अमराठी निर्माते, तंत्रज्ञ यांचं नातं घट्ट होत चाललं आहे. मराठी सिनेमाविषयीचे या अमराठी लोकांचे प्रेम हे वाढत आहे. ही आपल्या सर्व मराठी लोकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे."

'झोलझाल' हा चित्रपटाचे कथानक एका बंगल्याभोवती फिरत असून हा चित्रपटात कुशल सोबतच मराठी चित्रपट सृष्टीचे या अनेक मोठे कलाकार आहेत. 'झोलझाल' या चित्रपटाची निर्मिती गोपाळ अग्रवाल, आनंद गुप्ता आणि संजना जी.अग्रवाल यांनी केली असून, सारिका ए. गुप्ता, विनय अग्रवाल हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर रश्मी अग्रवाल, स्वप्नील गुप्ता यांनी क्रिएटिव्ह प्रोड्युसर काम पाहिले असून अमोल कांगणे, आर्णव शिरसाट सहयोगी निर्माता आहेत.या चित्रपटाचे नजीब खान हे छायाचित्रकार आहेत.या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता शिवाजी डावखर असून मानस कुमार, संजीव सोनी आणि आनंद गुप्ता यांनी चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहे.

'झोलझाल' हा सिनेमा येत्या १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive