By  
on  

Cuteness Overloaded! जिजा कोठारेचा हा गोड व्हिडीओ तुम्ही पुन्हा पुन्हा पाहाल

म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. ही म्हण अभिनेते-दिग्दर्शक आणि निर्मीते महेश कोठारे यांची चिमुकली नात जिजा सार्थ ठरवतेय. आदिनाथ आणि कोठारे यांची ही गोंडस छकुली फक्त अडीच वर्षांची आहे व आत्तापासूनच ती तिच्या अभिनयाचे विविध सुंदर कलागुण दाखवतेय. जिजाचा एक क्युट व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. इतकंच नाही तर जिजाला तात्या विंचूसुध्दा खुप आवडतो, हे खुद्द तिनेच सांगितलंय. 

तर त्याचं झालं असं झी मराठीवरील खास लहान मुलांसाठीचा शो 'अळीमिळी गुपचिळी' मध्ये जिजाने आई-बाबा व आजोंबा महेश कोठारेंसह हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचं खुमासदार आणि मुलांच्या कलेनं सूत्रसंचालन अभिनेते अतुल परचुरे करतात. व त्यांना तशीच जबरदस्त साथ अभिनेत्री स्नेहलता वसईकर देते. सेलिब्रिटी आणि त्यांच्या मुलांसोबत धम्माल गप्पा, गाणी व खेळ अशा आशयाचा हा कार्यक्रम असतो. 

या कार्यक्रमात जिजाची आई म्हणजेच अभिनेत्री उर्मिला कानेटकर तिला विविध प्राणी-पक्ष्यांचे आवाज काढायला सागंते व जिजा तसेच चक्क हावभावांसह काढून दाखवताना पाहायला मिळतेय, त्यामुळे तिच्यातले अभिनयाचे गुण आत्तापासूनच दिसू लागले आहेत. हा व्हिडीओ पाहताना तुम्हीसुध्दा 'किती गोड'असं म्हटल्याशिवाय राहूच शकणार नाहीत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Wishing you all a very Happy Children's Day ️

A post shared by Urmilla Kothare (@urmilakothare) on

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive