By  
on  

मिलिंद सोमणने पुस्तकात केला गौप्यस्फोट, राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबतच्या आठवणींना दिला उजाळा 

अभिनेता मॉडेल मिलिंद सोमण हा त्याच्या लुक्समुळे, फिटनेसमुळे कायम चर्चेत राहिला. स्वत: पेक्षा अर्ध्या वयाची गर्लफ्रेंड अंकिताशी लग्न केल्यामुळेही मिलिंद चर्चेत राहिला. मात्र आता चर्चा होत आहे त्याच्या  ‘मेड इन इंडिंया’ या पुस्तकाची सध्या बरीच चर्चा होत आहे. या पुस्तकातून मिलिंद सोमणने अनेक खुलासे केले आहेत. यातच त्याने या पुस्तकात एक गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेला असल्याचे त्याने या पुस्तकात सांगीतले आहे. याविषयी सांगताना त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबतच्या त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 


याविषयी मिलिंद सोमणने पुस्तकात असं नमूद केलं आहे की, “कुटूंबियांनी मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जाण्यासाठी सांगीतलं होतं. मला तिथे जायला भिती वाटायची आणि मी शाखेत लपून बसायचो. माझ्या मर्जीविरोधाता मला तिथे जाण्यासाठी सांगीतल्याने मी नाराज होतो.”


“सध्या माध्यमांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी ज्या गोष्टी पाहायला आणि वाचायला मिळतात त्या आश्चर्यचकीत करणाऱ्या आहेत.” असंही तो म्हटलाय.  “संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत संघाच्या शाखेत जे शिकवलं जायचं ते मला आजही आठवत आहे. खाकी पॅन्ट घालून आम्ही मार्च करायचो, योग करायचो आणि व्यायामही करायचो. त्या ठिकाणी आम्ही गाणीही गायचो, संस्कृत वाचनाचेही पठण व्हायचं. शाखेशी जोडले गेलेल्यांचे हिंदूंबद्दल विचार काय होते हे मला माहित नाही. परंतु त्यांनी त्यांचे विचार हे आमच्यावर कधीच लादले नाही.” असंही मिलिंद सोमणने या पुस्तकात म्हटलं आहे. 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive