By  
on  

इम्तियाज अलीच्या वेबसिरीजमध्ये झळकणार ही मराठमोळी अभिनेत्री , सोशल मिडीयावर ग्लॅमरस फोटो चर्चेत 

अभिनेत्री आदिती पोहणकर ही सध्या क्वचितच मराठी सिनेमांमध्ये पाहायला मिळतेय. ‘लव्ह सेक्स और धोका’ या हिंदी सिनेमातून आदितीने फिल्म करियरला सुरुवात केली होती. आणि त्यानंतर ती ‘कुणासाठी कुणीतरी’ आणि ‘लय भारी’ या दोन मराठी सिनेमांमध्ये झळकली. सध्या सोशल मिडीयावर आदितीच्या फोटोंची प्रचंड चर्चा होत आहे. तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंवर सोशल मिडीयावर लाईक्सचा वर्षाव होत आहे. 

आदितीने नुकतच प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अलीसोबत काम केलं आहे. इम्तियाजच्या ‘शी’ या वेबसिरीजमध्ये आदिती झळकणार आहे. येत्या 20 मार्चला ही वेबसिरीज प्रदर्शित होत आहे. 


आदितीने रंगभूमीवरही काम केलं आहे. शिवाय काही काळ तिने मॉडेल म्हणूनही काम केलं आहे. नुकतच आदितीने प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा यांच्यासोबतही काम केलं आहे. 


 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive