By  
on  

यासाठी अर्शद वारसीने केलं अमेय वाघचं कौतुक

सर्किटच्या व्यक्तिरेखेमधून मनांवर राज्य करणारा अभिनेता म्हणजे अर्शद वारसी. अर्शदने नुकतंह अमेय वाघ आणि इतर कलाकारांचं कौतुक करणारी पोस्ट शेअर केली. अर्शद आणि अमेय ‘असूर’ नावाच्या वेबसिरीजमध्ये एकत्र काम करत आहेत. एका सिरीअल किलर आणि पौराणिक मिथ्थ्यांवर ही सिरीज आधारली आहे. अमेय यात रसूल शेख या व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे.

 

 

अर्शद आपल्या पोस्टमध्ये म्हणतो. ‘ ‘असूर’ नुकताच पाहिला. खुपच उत्तम. रिद्धी डोगरा, अनुप्रिया गोएंका, बरुण सोबती, शरीभ हाश्मी आणि अमेय वाघ तुम्ही खुपच उत्तम काम केलं आहे.’ यावर अमेयने रिट्वीटही करत रिप्लायही दिला आहे. तो म्हणतो, ‘ मी आपला खुप मोठा फॅन आहे सर. हे कौतुक माझ्यासाठी खुप महत्त्वाचं आहे. तुमच्यासोबत आणि टीमसोबत काम करण्याची उत्सुकता आहे. अमेय अलीकडेच ‘धुरळा’ या सिनेमात दिसला होता.

Recommended

PeepingMoon Exclusive