By  
on  

प्रसिध्द ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचं निधन

मराठी चित्रपट सृष्टीमधील ज्येष्ठ व प्रसिध्द अभिनेते जयराम कुलकर्णी यांचं निधन झालं. पुण्यामध्ये आज (मंगळवारी) पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.ते ८८ वर्षांचे होते.  आज दुपारी बारा वाजता त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मराठी कलासृष्टीला लाभलेला एक हरहुन्नरी अभिनेता म्हणून ते ओळखले जात. 

'खट्याळ सासू नाठाळ सून', 'माझा पती करोडपती', 'अशी ही बनवाबनवी', 'थरथराट', 'भुताचा भाऊ', 'दे दणादण', 'आयत्या घरात घरोबा', 'धुमधडाका', 'झपाटलेला' अशा अनेक  सिनेमांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे आणि अशोक सराफ या तिकडीसोबत ते हमखास सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकायचे. 

जयराम हे अभिनेत्री मृणाल कुलकर्णींचे सासरे.जयराम कुलकर्णी यांच्यामागे पत्नी डॉ. हेमा कुलकर्णी, मुलगा रुचिर आणि सून मृणाल आणि नातू अभिनेता विराजस कुलकर्णी असा परिवार आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive