By  
on  

कोरोनाविषयी गैरसमज आणि अफवा पसरवू नका, उगाच भिती निर्माण करू नका – स्वप्निल जोशी 

कोरोना व्हायरस (COVID-1) या भयानक आजारापासून बचाव करण्यासाठी विविध प्रकारे काळजी घेतली जात आहे. मनोरंजन विश्वाचही काम बंद करण्यात आलं असून काही ठिकाणी वर्क फ्रॉम होमची सुविधाही उपलब्ध झाली आहे. यातच कोरोनावर विविध गाणी  आणि मीम्सचा पाऊस सोशल मिडीयावर कोसळलाय. या सगळ्यावर अभिनेता स्वप्निल जोशीने नुकत्याच एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे. याविषयी बोलत असताना स्वप्निल म्हणतो की, “मला लोकं विचारतात की कोरोनाविषयी तुम्ही काय आवाहन कराल ? तर काय करू नका याचं आवाहन मी करेल. कृपया करून गैरसमज पसरवू नका, अफवा पसरवू नका, आणि जर मदत करू शकत नसाल तर निदान भिती निर्माण करू नका. अनेक देशांना याचा फटका बसला आहे. असं असताना त्याच्याबद्दल थिल्लरपणे वागणं, बोलणं याचा खूप वाईट परिणाम समाजात होत आहे. जर मदत करता येत नसेल तर आपल्यामुळे त्याचा त्रास आणि गैरसमज वाढतील असं तरी करु नका.” 

काही देशांमध्ये हा कोरोना व्हायरस असलेल्या रुग्णांना वाळीत टाकण्यात आलय तर काहींवर बहिष्कार टाकण्यात आलाय. याविषयीही स्वप्निल बोलता झाला. स्वप्निल म्हटला की, “कोरोना हा आजार आहे हा अपराध नाही. जसं बाकी आजारी असलेल्या रुग्णांना आपण सहानुभूतीने पाहतो, काय मदत करता येईल हा विचार करतो. तोच विचार याबाबतीतही व्हायला पाहिजे. त्यांनी काही गुन्हा नाही केलाय दुर्दैवाने त्याना हा व्हायरस झाला असेल तर इतर आजारांसारखा हाही एक आजार आहे. आणि हा एक बरा होऊ शकणारा आजार आहे.”
या आजाराविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी, लोकांनी आपली काळजी घेण्यासाठी बरेच कलाकार सोशल मिडीयाच्या माध्यमातून आवाहन करताना दिसत आहेत. 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive