By  
on  

Video : करोनाने केला कहर, पण या मराठमोळ्या अभिनेत्रीला सुचलं असं काही

जगभर करोना विषाणूची भयंकर दहशत पसरलीय. दिवसेंदिवस या रोगामुळे अनेकांना प्राणांना मुकावे लागते आहे. आपल्या देशातसुध्दा हा रोग वणव्या सारखा पसरतोय आणि फक्त खबरदारी घेणं इतकंच सध्या आपल्या हातात आहे. संपूर्ण दैनंदिन व्यवहार करोनामुळे ठप्प झाले आहे.

अवघ्या मनोरंजनसृष्टीलाही या करोचा फटका बसला आहे. अनेक सिनेमांचे प्रदर्शन लांबणीवर पडले तर मालिका, सिनेमे, वेब शो यांचे शूटींग व  नाटकांचे प्रयोग रद्द करण्यात आले.  सर्व सेलिब्रिटी घरी राहून सामान्यांनासुध्दा  सोशल मिडीयावरुन सुरक्षित राहण्याचं व काळजी घेण्याचं आवाहन करतायत.  काही सेलिब्रिटी हा वेळ पुस्तकं वाचण्यात घालवतायत तर कोणी कुटुंबासोबत वेळ घालवण्यास प्राधान्य देतायत. प्रत्येक जण हे करोनाचं सावट दूर करण्यासाठी आपापल्या परीने मार्ग काढतायत. 

सर्वत्र करोनाची भीती व दहशत पसरली असताना नेहमीच सामाजिक भान जपणारी प्रसिध्द अभिनेत्री अमृता सुभाषने मात्र एक वेगळीच गोष्ट केली आहे. तुम्हालासुध्दा ती जाणून घेण्याची उत्सुकता असेल. करोनाच्या संकटावर मात करू शकू असं सांगणारं व धीर देणारं एक प्रेरणादायी गाणं अमृताने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमधून सादर केलं आहे. तसंच ही प्रार्थना मित्र व दिग्दर्शक सुनिल सुकथनकरने लिहली असल्याचंही अमृताने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. सर्वांच्या आरोग्यासाठी ही प्रार्थना असंस अमृता सांगते. 

एकूणच काय तर अवघं जग आता हे करोनाचं संकंट लवकर टळो यासाठी प्रयत्नशील आहे व अशा प्रार्थननेची सर्वांना गरज आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive