सिनेसृष्टीत कधी कोणाचं नाव कोणासोबत जोडलं जाईल याचा काही नेम नसतो. पण कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल चवीचवीने जाणून घ्यायला चाहत्यांना मात्र खुप आवडतं. सध्या सोशल मिडीयामुळे चाहते व सेलिब्रिटी यांच्यातलं अंतर खुपच कमी झालं आहे. आता, हेच बघा ना ‘घाडगे & सून’ मालिकेमुळे घराघरांत पोहचलेली अभिनेत्री भाग्यश्री लिमयेने एक फोटो पोस्ट केला आणि त्यावर चाहत्यांनी तर्क लावूनही टाकला.
मराठीतला हॅण्डसम अभिनेता भूषण प्रधान आणि भाग्यश्री लिमयेचा एक फोटो प्रचंड व्हायरल होतोय. दोघांनी पुण्यातील पंचातारांकीत हॉटेलात एक छान फोटो काढला व भाग्यश्रीने तो सोशल मिडीयावर पोस्ट करत त्याला मजेशीर कॅप्शन पण दिलं. असा व्यक्ती जो मला आवडतो…आमच्या मागे उभा असलेला नव्हे…’, असा....अनेकांनी या फोटोवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
इतकंच नव्हे तर चाहते म्हणाले तुमची जोडी खुपच छान आहे, तुम्ही एकमेकांसोबत मस्त वाटताय..त्यामुळे अशा कॉमेंट्समुळे या दोघांची नवी केमिस्ट्री तर नाही ना असा प्रश्न सर्वांना पडलाय. किंबहुना आगामी प्रोजेक्टनिमित्तसुध्दा ही जोडी जमली असू शकते. त्यामुळे सर्वांनाच ही ऑनस्क्रीन केमिस्ट्री आहे की ऑफस्क्रीन हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे.