कोरोना व्हायरसच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी प्रत्येक जण काळजी घेताना दिसत आहेत. त्यातच मनोरंजन विश्वातील कलाकारांचं चित्रीकरण 19 ते 31 मार्चपर्यंत बंद असल्याने, हे कलाकार घरातच बसले आहेत. या व्हायरसपासून वाचण्यासाठी बाहेर कुढेही न जाता आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा विचार या कलाकारांनी केला आहे.
मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये काम करणारा अभिनेता माधव देवचकेही घरात बसून आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतोय. एवढच नाही तर तो त्याच्या पत्निला आणि आईलाही घरकामाता मदत करत असल्याचं त्याने नुकत्याच केलेल्या व्हिडीओमध्ये सांगीतलयं.
तर तुझ्यात जीव रंगला मालिकेतील प्रसिद्ध चेहरा राज हंचनाळेही शुटिंग बंद असल्याने घरात बसलाय. मात्र राज घरात बसून वेळेचा सदुपयोग करत आहे. हा वेळ त्याने मेडिटेशन आणि वाचनासाठी दिला आहे. शिवाय त्याच्या परिवाराची रोग प्रतिकारक शक्ति वाढवण्यासाठी व्यायाम आणि स्वच्छतेकडेही लक्ष दिलं जात असल्याचं त्याने सांगीतलं. मात्र कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असही आवाहन त्यानं केलं आहे. कोरोनाच्या नावानेच कित्येकांना धास्ती भरली आहे. कोरोनाच्या भितीपोटी घाबरलेल्या या लोकांना सकारात्मक दृष्टीकोन देण्याचा या कलाकारांचा मानस आहे. म्हणूनच अशा व्हिडीओच्या माध्यमातून आणि सोशल मिडीयावरील पोस्टच्या माध्यमातून कलाकार काळजी घेण्याचं आणि वेळेचा सुदपयोग करण्याचं आवाहन करत आहेत.