कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात भितीचं वातावरण आहे. काहींनी घरातच बसणं पसंत केलेलं आहे. यातच मराठी कलाकार सोशल मिडीयाच्या माध्यमातून लोकांना काळजी घेण्याचं आवाहन करत आहेत. अभिनेता सुनील तावडे यांचा मुलगा अभिनेता शुभांकर तावडेनेही असचं सकारात्मक आवाहन केलं आहे. शुभांकर म्हणतो की, “सगळ्यांना आवाहन करतो की घरात बसा, पार्टी वैगेरे नंतर करा. बाहेर जाणार असाल तर मास्क नक्की घाला आणि शक्यतो घरीच राहा. मी सुद्धा तेच करतोय. घरी सगळे एकत्र असतात हे क्वचितच होतं. मात्र यानिमित्ताने सगळे घरी एकत्र आलो आहोत.”
शिवाय शुभांकर त्याचे छंदही जोपासतोय. शुभांकरला त्याच्या आवडत्या सिरीजची पुस्तकं वाचायला प्रचंड आवडतं. 'गेम ऑफ थ्रोन्स' या सिरीजचा शुभांकर खुप मोठा चाहता आहे. आणि म्हणूनच सध्या घरात बसून शुभांकर या सिरीजचं पुस्तक वाचणार आहे. शुभांकरने हे पुस्तक अर्ध वाचलेलं आहे. आणि लवकरच तो हे पुस्तक घरात बसून वाचून पूर्ण करणार आहे.
कोरोनाच्या धोक्यापासून बचाव करण्यासाठी ही कलाकार मंडळी घरी बसून आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. त्यासोबत आपला छंद जोपासण्याचाही प्रयत्न करत आहेत. सध्याची परिस्थिती पाहता अशा सकारात्मक गोष्टींची फार गरज असल्याने कलाकार मंडळी यांची खबरदारी घेत सकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत.