By  
on  

ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी सिध्दूल तब्बल 25 वर्ष वाट पाहावी लागली

प्रत्येकाचा आयुष्यात एक रोल मॉडेल असतो. त्याला पाहून आपल्यालाही  मेहनत करुन, जिद्दीने आयुष्यात काहीतरी करुन दाखलिण्याचा हुरुप येतो. आपल्या महाराष्ट्राने अनेक हिरे घडवले आहेत. आज देशाला त्यांच्या अतुलनीय कामगिरीचा अभिमान वाटतो. असाच एक हिरा म्हणजे भारतरत्न सचिन तेंडूलकर.

सचिन..सचिन..सचिन.. असं नुसतं घरातूनच टीव्हीवर मॅच पाहून ओरडलं तरी आपल्यात एक वेगळाच उत्साह संचारतो. ह्या क्रिकेटच्या देवाला एकदातरी मैदानात प्रत्यक्ष खेळताना पाहण्याचं प्रत्येकाचं स्वप्नं असतं. तसंच आपल्या लाडक्या  सिध्दूचंही होतं.म्हणजेच अभिनेता सिध्दार्थ जाधवचं.पण त्यासाठी त्याला तब्बल 25 वर्ष वाट पाहावी लागली. पण अखेर सचिन तेंडुलकरांना प्रत्यक्षात खेळताना पाहण्याचा योग आला व ते स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद खुद्द इन्स्टाग्रामवर पोस्ट शेयर करच सिध्दार्थने वर्णन केला आहे. 

 

सिध्दार्थ पोस्टमध्ये म्हणतो...

सचिन..सचिन..सचिन..
खरंतर प्रत्येक गोष्टीचा एक प्रवास असतो..लहानपणापासून 'भारतरत्न सचिन तेंडुलकर' यांना खेळताना पाहतोय, पण फक्त टीव्हीवर.. ब्लॅक अँड व्हाईट ते 4k रिझोलुशन..
पण प्रत्येक्षात त्यांना खेळताना पाहण्याचा योग आलाच नव्हता.. आणि ही संधी उपलब्ध झाली ती 'रोड सेफ्टी वल्ड सिरीज' च्या निमित्ताने...
मी पहिल्यांदाच स्टेडियम मध्ये जाऊन लाईव्ह मॅच बघणार होतो.. तसं सेलेब्रिटी क्रिकेट लीग (CCL) च्या वेळी स्टेडियम मध्ये खेळलो होतो.. पण कधी कुठलीही मॅच पहिली नव्हती...
आणि "सचिन तेंडुलकर" सरांना पाहण्याचा हा प्रवास... तसं पाहिलं तर एक दिवसाचा.. पण त्यासाठी मला जवळजवळ २५ वर्ष वाट पाहावी लागली..
सचिन..सचिन..सचिन..

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

सचिन..सचिन..सचिन.. खरंतर प्रत्येक गोष्टीचा एक प्रवास असतो..लहानपणापासून 'भारतरत्न सचिन तेंडुलकर' यांना खेळताना पाहतोय, पण फक्त टीव्हीवर.. ब्लॅक अँड व्हाईट ते 4k रिझोलुशन.. पण प्रत्येक्षात त्यांना खेळताना पाहण्याचा योग आलाच नव्हता.. आणि ही संधी उपलब्ध झाली ती 'रोड सेफ्टी वल्ड सिरीज' च्या निमित्ताने... मी पहिल्यांदाच स्टेडियम मध्ये जाऊन लाईव्ह मॅच बघणार होतो.. तसं सेलेब्रिटी क्रिकेट लीग (CCL) च्या वेळी स्टेडियम मध्ये खेळलो होतो.. पण कधी कुठलीही मॅच पहिली नव्हती... आणि "सचिन तेंडुलकर" सरांना पाहण्याचा हा प्रवास... तसं पाहिलं तर एक दिवसाचा.. पण त्यासाठी मला जवळजवळ २५ वर्ष वाट पाहावी लागली.. सचिन..सचिन..सचिन..

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct) on

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive