एकीकडे मनोरंजन विश्वातील सगळी कामं बंद आहेत, शुटिंग बंद, थिएटर्स बंद, नाट्यगृह बंद तेव्हा ही कलाकार मंडळी काय करणार ? तर ही कलाकार मंडळी घरात बसून आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहेत. तर काही आपले छंद जोपासत आहेत. सोशल मिडीयावर आपल्या शुटिंग विषयी अपडेट पोस्ट करणारे हे कलाकार आता आपल्या कुटुंबासोबतचे फोटो, पुस्तक वाचतानाचे फोटो, आपल्या मुलांसोबतचे फोटो, पेटिंग करतानाचे फोटो एक ना अनेक गोष्टी घरात बसून करत आहेत आणि ते सोशल मिडीयावर पोस्ट करत आहेत.
यातच अभिनेत्री नेहा पेंडसेने काही फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. एकीकडे बहुतांश कलाकार घरात बसलेत तर नेहा ही जयपुरमधील एका आलिशान विलामध्ये सुट्टीची मजा लुटतेय. नुकतच लग्नबंधनात अडकलेली नेहा अर्थात पति शार्दुलसोबत इथे वेळ घालवत असणार एवढं नक्की. हो फोटो पाहून सध्या नेहा जयपुरमध्ये असल्याचं कळतय. या सुंदर विलामध्ये नेहा निवांत क्षण एन्जॉय करत असल्याचं दिसतय. अर्थात या विलाच्या ठिकाणी जास्त गर्दी नसल्याने नेहानी ही जागा निवडली असावी. शिवाय नेहा आणि शार्दुल कोरोना पासून बचाव करण्यासाठी योग्य काळजी घेत असावेत यात शंका नाही. मात्र हे फोटो आत्ताचे आहेत की नाही हे अजून समजलेलं नाही. हा फोटोंना सोशल मिडीयावर प्रचंड लाईक्स मिळत आहेत.
याचवर्षी जानेवारी महिन्यात नेहा आणि शार्दुल सिंह ब्यास यांचं लग्न झालं होतं. पुण्यातील एका आलिशाल हॉटेलात परिवार आणि जवळच्या मित्रमंडळीच्या हजेरीत हे लग्न पार पडलं होतं.