By  
on  

अभिनेत्री मधुराचा मुलगा दर एका तासाला हात स्वच्छ धुतोय, अभिनेत्री सांगतेय तुम्हीही काळजी घ्या

एकीकडे कोरोना व्हायरसचा वाढता प्रार्दुभाव पाहता सगळेच आपापली काळजी घेत आहेत. मनोरंजन विश्वाचही काम थांबल्याने कलाकार घरातच बसले आहेत. आणि याच निमित्ताने आपल्या कुटुंबासोबत ते वेळ घालवत आहेत. 

अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम ही देखील स्व:ताची आणि कुटुंबाची काळजी घेत आहे. नुकत्याच पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये मधुरा सगळ्यांना हात स्वच्छ धुवून काळजी घेण्याचं आवाहन करतेय. मधुराचा लहान मुलगा हा दर एक तासाने हात स्वच्छ साबणाने धुत असल्याचं या व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे. अशा पद्धतिने आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचं आणि कोरोनापासून बचाव करण्याचं आवाहन मधुरा करतेय.

बरेच कलाकार मंडळी अशाप्रकारे व्हिडीओच्या माध्यमातून आणि सोशल मिडीयावर पोस्ट करुन याविषयीची जागरुकात निर्माण करण्याचं प्रयत्न करत आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive