By  
on  

 या 100 वर्षांच्या आजी आहेत सुबोध भावेच्या चाहत्या, गायत्री-सुबोधच्या आरोग्यासाठी केला होता नवस

कलाकार मंडळी त्यांच्या कलाकृती मालिका, नाटक आणि सिनेमांमधून सादर करतात. मात्र त्यांच्या काही भूमिका त्यांचं काम प्रेक्षकांना इतकं भावतं की त्यांच्याशी प्रेक्षकांचं एक अतुट नातं निर्माण होतं. कलाकारांचे चाहते असे म्हणून आपण त्यांना संबोधतो. अभिनेता सुबोध भावेचे कित्येक चाहते आहेत. सुबोधची तुला पाहते रे हे मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेतील गायत्री दातार आणि सुबोधची जोडी ही पसंत केली गेली. एक 100 वर्षांच्या आजीही या मालिकेच्या आणि सुबोधच्य प्रचंड चाहत्या आहेत. 

 

युवा डान्सिंग क्विन या डान्स रिएलिटी शोच्या मंचावर जेव्हा या आजी आल्या तेव्हा त्यांनी गायत्रीची भेट घेतली. शिवाय सुबोध भावेसोबत व्हिडीओ कॉल केल्यानंतर त्याला भेटण्याची इच्छाही व्यक्त केली. सुबोधला व्हिडीओ कॉलवर पाहुन त्या भावुकही झाल्या होत्या. यावेळी या आजीना लवकरच भेटण्यार असल्याचं सुबोध यावेळी म्हटला नुकतच सुबोधने याविषयीची पोस्ट सोशल मिडीयावर केली. यात सुबोध म्हणतो की, “100 वर्ष वयाच्या पनवेलच्या आजी, आमच्या आरोग्यासाठी नवस करतात, भेटायला म्हणून इतक्या लांब येतात. आजी तुमच्या या प्रेमाचा उत्तराई आम्ही कसे होऊ? तुम्हाला विनंती करु शकतो की तुमचा आशीर्वाद नेहमीच माझ्यावर असाच राहावा, तुम्हाला भेटालया नक्की येणार”


कलाकारांना असे अनुभव कित्येकदा येत असतात. मात्र अशा या आजीसारखे मिळणारे आशीर्वाद आणि त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती जेव्हा मिळते तेव्हा कलाकाराला खरं समाधान मिळतं एवढं नक्की.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive