जगभर करोना विषाणूने थैमान घातलंय. करोनामुळे दैनंदिन जीवनसुध्दा ठप्प झालं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून व करोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक जण आज घरात बंदीस्त आहे. पण हा वेळ कसा घालवायचा याचा आता प्रत्येकालाच प्रश्न पडला आहे. एक-दोन दिवस आराम केल्यानंतर कंटाळा येणं हे स्वाभाविकच आहे. पण परदेशात वास्तव्यास असणा-या सुप्रसिध्द अभिनेत्री मात्र या खास कामांमध्ये रमल्या आहेत.
अश्विनी भावे या कॅलिफॉर्नियात राहतात. तेथे ‘शेल्टर इन प्लेस’ अशी सक्त ताकीद नागरिकांना देण्यात आली आहे.त्यामुळे अचानक मिळालेल्या या सुट्टीचा सदुपयोग अभिनेत्री अश्विनी भावे स्वयंपाक, वाचन आणि बागकामात करताना पाहायला मिळतायत.
अश्विनी भावे या नेहमीच आपल्या कुटुंबाला प्राधान्य देताना पाहायला मिळाल्या आहेत . त्या लग्नानंतर परदेशात जरी वास्तव्यास असल्या तरी अजूनही त्यांची नाळ भारताशी जोडली गेली आहे.