By  
on  

पाहा Video : घर कोंबडा अमेय वाघ म्हणतोय माझे हे व्हिडीओ तुम्हाला सहन करावे लागतील

भारतातही कोरोना व्हायरसचा शिरकाव केल्याने भितीचं वातावरण निर्माण झालय. मात्र यातही काही भारताबाहरे गेलेले नागरीक भारतात परतले आहेत. यापैकीच एक आहे मराठी अभिनेता अमेय वाघ. अमर फोटो स्टुडिओ या नाटकाच्या दौऱ्यासाठी  अमेय कॅलिफोर्नियात होता. नुकताच अमेय भारतात परतलाय त्यामुळे त्याच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का आहे. 


घरात बसून काय करायचं असा प्रश्न अमेयला पडला आहे. त्यातच त्याला सोशल मिडीयावर विविध व्हिडीओ पोस्ट करण्याची कल्पना सुचली आहे. नुकताच अमेयने कॅलिफोर्निया ते भारतात परतण्याचा अनुभव आणि विमानतळावर कशी काळजी घेण्यात येते यासंबंधीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यानंतर नुकताच त्याने एक मजेशीर व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत सुरुवातील अमेय म्हणतो की “कोरोनाच्या होम क्वारंटाईन झाल्यानंतर मी वेगवेगळ्या गोष्टी करतोय. यावेळी मी एक वेगळीच गोष्ट करतोय अशी गोष्टी की खरोखर ती बघून मी तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यांतून पाणी काढू शकतो.” 

असं म्हणत अमेय घराच्या स्वयंपाक घरात कांदे कापत असल्याचा हा व्हिडीओ आहे. अर्थात घरात बसून स्वयंपाक घरात अमेय कुकिंग करत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Back in India! Safe and sound!

A post shared by amey wagh (@ameyzone) on

बहुतांश लोकं कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे घरातच बसणं पसंत करत आहेत आणि तश्या सुचनाही राज्य सरकारने दिल्या आहेत. मात्र इतके दिवस घरात बसण्याची सवय नसणारे कलाकार जेव्हा जास्त काळासाठी घरात बसलेत त्यांनी अशाप्रकारचे मजेशीर व्हिडीओ सोशल मिडीया साईट्सवर पोस्ट केले आहेत. 
 
 

Recommended

PeepingMoon Exclusive