मराठी मोनरंजन विश्वातील एक क्युट सेलिब्रिटी कपल म्हणून अभिनेता अनिकेत विश्वासराव व त्याची पत्नी स्नेहा चव्हाणकडे पाहिलं जातं. दोघंही मेड फॉर इच अदर आहेत. दोघांचेही एकेमेतांसोबतचे अनेक रोमॅण्टीक फोटो आपल्याला सोशल मिडीयावरुन नेहमी पाहायला मिळतात.
स्नेहा ही सोशल मिडीयावर खुप अॅक्टीव्ह असते. नुकताच तिने तिचा आणि अनिकेतचा एक भन्नाट व्हिडीओ सोशल मिडीयावरुन शेअर केला आहे, तुम्ही जर तो पाहिलात तर तुम्हालाही हसू अजिबातच आवरणार नाही. छोट्या पडद्यावरची प्रसिध्द जोडी दयाबेन आणि जेठालाल यांच्यातील हटके संवाद दोघांनी अगदी अफलातून स्टाईलमधून सादर केले आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडीओ पाहा आणि खळखळून हसा.
स्नेहाने आणि अनिकेत या जोडीने 10 डिसेंबर 2018 रोजी लग्नगाठ बांधली. दोघांनी 'हदयात वाजे समथिंग' या सिनेमात एकत्र काम केलं आहे. पण हे अरेंज मॅरेज असल्याचा खुलासा खुद्द स्नेहानेच केला.
संजय लीला भन्साळी यांची निर्मिती असलेला पहिला मराठी सिनेमा 'लाल इश्क'द्वारे स्नेहाने सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
सध्या स्नेहा आणि अनिकेत दोघंही नाटकांमध्ये रमले आहेत. अनिकेतची प्रमुख भूमिका असलेलं 'हाफ मर्डर' हे नाटक रंगभूमीवर गाजतंय तर स्नेहा 'विच्छा माझी पुरी करा' या लोकनाट्यात झळकतेय.