Coronavirus: तुमका नाय माहित ....अण्णांना स्वयंपाक पण येतो

By  
on  

करोनाचा धोका आ वासून उभा असताना आता संपूर्ण शहरच लॉकडाऊन करण्याचा निर्णय मुख्यमत्री उध्दव ठाकरे यांनी घेतला.अत्यावश्यक सेवा व दूध,भाजीपाला आदी जीवनावश्यक वस्तूंची दुकानंच फक्त आता सुरु राहणार आहेत. करोनासोबत दोन हात करण्यासाठी फक्त घरी राहा सुरक्षित राहा एवढाच खबरदारीचा उपाय सर्वांना करायचा आहे. 

सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वचजण घरी आहेत. प्रत्येक जण आपल्याला मिळालेल्या या वेळेचा सदुपयोग करण्याचे नाना पध्दती अवलंबतो आहे. रात्रीस खेळ चाले मालिकेतील अण्णा नाईकांचा दरारा तुम्हाला वेगळा सांगण्याची गरज नाही. या मालिकेतील अण्णा म्हणजेच अभिनेते माधव अभ्यंकर  यांनी शूटिंग बंद असल्याने स्वयंपाकघरावर ताबा मिळवला आहे व जेवण बनवण्यात मग्न झाले आहेत. कुटुंबियांसाठी आवडीचे पदार्थ तयार करत आहेत. त्यामुळे अण्णांचं हे अनोखं रुप पाहून चाहते नक्कीच चकीत झाले असणार. 

Recommended

Loading...
Share