By  
on  

दिग्दर्शक समीर विद्वांस यांची ही कविता वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

करोनाने जगभर आपली दहशत माजवली आहे. या वैश्विक महामारीला परतवून लावण्यासाठी सरकारी यंत्रणा, डॉक्टर्स, आरोग्य सेवेतील कर्मचचारी युध्दपातळीवर काम करतायत. सर्व नागरिकांना घरात राहा, सुरक्षित राहा असं खबरदारीचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे. 

महाराष्ट्र सरकारने नुकतंच लॉकडाऊन जाहीर केलं आहे, त्यामुळे सर्व दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत. परंतु आपण घरात राहून ऑफीसचं काम करु शकतो. महिना दोन-महिना पुरेल इतका अन्नधान्याचा साठा आपल्याकडे सहज असतो. त्यामुळे तितकी आर्थिक काळजी आपल्याला नसते. मिळालेला फावला वेळ आपण छंद जोपासण्यात घालवतोय. पुस्तकं  वाचतोय, नवनवीन पदार्थ करतोय, गाणी, चित्रकला इ. खुप लांबलचक ही यादी आहे, पण कधी विचार केलाय ज्याचं हातावर पोट आहे त्यांचं काय....त्यांचा धंदाच नाही होणार तर ते खाणार काय..जगणार कसे. याच धगधगत्या वास्तवावर आधारित एक मार्मिक कविता धुरळा फेम दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी केली  आहे. ही कविता वाचून तुमच्याही डोळ्यात नक्कीच पाणी येईल. 

बाजारातील एका फुलवाल्या आजींवरची समीर विद्वांस यांची ही कविता संपूर्ण जगण्याचं दाहक वास्तवच तुमच्यासमोर मांडते. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive