रविवारी झालेल्या जनता कर्फ्यूच्या दिवशी सायंकाळी 5 वाजता भारतीयांनी कोरोनाविरुद्ध सामन्यात आपल्या जिवाची पर्वा न करता काम करणाऱ्यांचे टाळ्या, घंटेचा नाद करून आभार मानले. बहुतांश लोकांनी वेगळ्या पद्धतिने आभार मानण्याचा प्रयत्न केला. काहींनी ढोल वाजवले तर काहींनी शंख नाद केला. मनोरंजन विश्वातील कलाकारही यात उत्साहाने सहभागी झाले होते.
मराठी कलासृष्टीतील प्रसिद्ध कोठारे परिवारी यात सहभागी झाले. घराच्या बालकनीत येईन आदिनाथ कोठारे, वडिल महेश कोठारे, आई, पत्नि उर्मिला कोठारे, मुलगी जिजासह सगळ्यांना टाळ्यांच्या गजरात आभार प्रदर्शन केलं. मात्र यावेळी कथक विशारद असलेली उर्मिलाने घुंगरू घातले आणि टाळ्यांसह घुंगरूनाद करत आपली मुलगी जिजासोबत आभार प्रदर्शन केलं. यावेळी आई उर्मिलाच्या घुंगरू नादासह जिजाही आनंदात टाळ्या वाजवताना दिसली. शिवाय आईच्य घुंगरूनादावर ती थिरकलीही. सोशल मिडीयावर उर्मिलाने हा व्हिडीओही पोस्ट केला आहे.
सोशल मिडीयावर उर्मिलाच्या या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.